बसच्या धडकेने वाघोलीत तरुणाचा मृत्यू

हवेली :प्रतिनिधी

पुणे-नगर महामार्गावर केसनंद फाटा येथील उद्रे पेट्रोलपंपासमोर दाम्पत्य रस्ता क्रॉस करीत असताना पाठीमागून बसने धडक दिल्याने जबरमार लागल्याने तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) रात्री घडली. लखन महादेव काळे (वय ३०, रा. वाघोली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचेनाव असून याप्रकरणी सीमा काळे यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर फरार झालेल्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.