परभणी (प्रतिनिधी) पूर्णा तालुक्यातील ताडकळस

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

शहरातील गट नं.३१२ मधील

सैनिक व बाळराज नगरच्या तब्बल १७७ रहिवाशांना पूर्णाच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी म.ज.म.अधिनियम १९९६ कलम ५० नुसार अतिक्रमण खाली करण्याची नोटीस देऊन ७ दिवसांची मुदत दिली आहे. 

त्यामुळे हवालदिल झालेले रहिवाशी घाबरले आणि त्यांनी हा सगळा प्रकार गंगाखेड विधानसभेचे संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या कानावर घातला. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.डॉ.गुट्टे यांनी तातडीने ताडकळस येथे जाऊन 'त्या' नोटीस धारकांची प्रत्यक्ष भेट घेतली. नोटीस बघितली. लोकांची आस्थेनं विचारपूस केली. वस्तुस्थिती समजून घेतली. याप्रसंगी 'त्या' रहिवाशांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या व्यथा आणि वेदना आ.डॉ.गुट्टे यांच्या समोर मांडल्या. 

त्यानुसार सविस्तर असे की, ताडकळस येथील सैनिक नगर व बळराज नगर मधील रहिवासी गेल्या ४० वर्षापासून तेथे राहात आहेत. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतने 'त्या' सर्व घरांची कायदेशीर नोंद करुन संबंधित घरांची कर वसुली सुद्धा केली आहे. तसेच 'त्या' सर्व घरांना नियमानुसार वीज, पाणी, रस्ते, आरोग्य सेवाही उपलब्ध झाल्या आहेत. तसेच हे सर्व नोटीस धारक वर्षानुवर्षे कर सुध्दा भरीत आहेत. मात्र तरीही तब्बल ४० वर्षानंतर तहसील कार्यालयाने त्यांना नोटीस दिल्यामुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी भेटून दिलासा दिला अन घाबरु नका, तुमच्या घराच्या वीटालाही कुणाला हात लाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. पुढे बोलताना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे म्हणाले की, तुम्ही गेली ४० वर्ष इथे राहात आहात. तुमच्या घराची नोंद ग्रामपंचायतला आहे. तुम्ही महसूल कर सुध्दा वर्षानुवर्षे भरत आहात. त्यामुळे हि जागा आणि घरे तुमच्या हक्काची आहेत. तहसील कार्यालयाने तुम्हाला दिलेली 'ती' नोटीस चुकीची आहे. त्याबद्दल मी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याशी बोललो आहे. त्यांना वस्तुस्थिती सांगितली आहे. तरीही प्रशासन कार्यवाही करणार असेल तर त्यांना आधी माझ्याशी संघर्ष करावा लागेल. तुमची घरे वाचविण्यासाठी मला कारागृहात जावे लागले तरीही माझी तयारी आहे. तुमच्या हक्काची लढाई यशस्वी करण्यासाठी मी तुमचे आधारकार्ड, घराचे फोटो, मिळालेली नोटीस, भरलेल्या टँक्स पावत्या, लाईटबील, निवेदन घेऊन तातडीने मुंबईत जाऊन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतो आणि प्रश्न निकाली काढतो.

 आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या आश्वासनाने 'त्या' नोटीस धारक रहिवाश्यांना हत्तीचं बळ मिळाले. आणि उपस्थित माय-माऊंल्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.

चौकट - १

अंकिताबाई आणि सुशीलाबाईंच्या बोलण्याने आमदारांचेही डोळे पाणावले...

'सायब, व्हती तेवढी कमाई खर्चून घर केलंय अन आता हि कागुद आलाय आता तान्हुली लेकरं घिवून कुटं जायाचं' अस रडत-रडत सांगणाऱ्या सुशीलाबाई मगरे आणि 'नाय तर आमाला जीवचं द्यावा लागल' असं म्हणाऱ्या अंकिताबाई कानडे यांचा भावनिक टाहो ऐकूण आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचेही डोळे पाणावले होते.

चौकट - २

यांनीही मांडला आक्रोश...

याप्रसंगी डॉ.त्रैलोकचंद्र महाजन, स्वातंत्र्यसैनिक पन्नालाल मुंदडा, बबनराव अवतरे, कैलास जाधव, नजीर पठाण, संदीप खंदारे, अंकिताबाई कानडे, सुशीलबाई मगरे, विठ्ठल घोडके, रुजू घोडके, सतीश अंभोरे, शेख ईनुस यांनीही पाणावलेल्या डोळ्यांनी आपला आक्रोश मांडला