औरंगाबाद : - दि.२८,श्री गणेश उत्सव समिती महासंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निराला बाजार, मोतीवाला कॉम्प्लेक्स, केएफसी बिल्डिंगमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते रविवारी (२८ ऑगस्ट) होणार आहे. दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघ महोत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय औताडे यांनी दिली.

या वेळी रोहयोमंत्री संदिपान भुमरे, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांची विशेष उपस्थिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार इम्तियाज जलील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, उद्योजक पद्माकर मुळे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रा.रमेश बोरनारे, प्रशांत बंब, विक्रम काळे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड, कैलास पाटील, मिलिंद दाभाडे, विलास औताडे,विनोद पाटील,अभिजित देशमुख, राजेन्द्र दानवे,भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांची उपस्थिती राहणार आहे.