सोलापूर :- सूर्यकांत रेवनय्या हिरेमठ वय 56 वर्षे रा:-सुशील नगर, विजापूर रोड, सोलापूर यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अनिल विठ्ठल दुपारगुडे वय 48, विकी उर्फ पांडू अरविंद वाघमारे वय 26, सुशिलाबाई विठ्ठल दुपारगुडे वय 65 सर्व रा:- सुशील नगर, सोलापूर यांना असिस्टंट सेशन्स जज्ज,सोलापूर यांनी दिलेली शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहेमद औटी यांनी रद्द करून आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, यातील आरोपी अनिल व विकी हे मयत सूर्यकांत यांच्या घरासमोरील कट्ट्यावर बसून दारू पिणे, जुगार खेळणे, लघुशंका करणे असे प्रकार करीत होते. आरोपींना बऱ्याच वेळा सांगून देखील आरोपी हे उलट मयतास शिवीगाळ व दमदाटी करीत होते.दि:- 8/2/2015 रोजी रात्रीच्या सुमारास अनिल व विकी हे दारू पिऊन पत्ते खेळत असताना मयत हा समजावून सांगण्यासाठी गेला असता तिघांनीही त्यास लाताबुक्क्यांनी मारहाण केली, सदरच्या त्रासाला कंटाळून हिरेमठ याने दि:- 9/2/2015 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली,तशा आशियाची चिट्टी देखील लिहून ठेवली होती. सदरचा खटला हा न्यायालयात चालला असता न्यायालयाने तिघांनाही हिरेमठ यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी धरून अनिल व विकी यास दोन वर्षाची तर सुशीलाबाई हिस सहा महिन्याची शिक्षा ठोठावली होती.

त्यावर तिघांनीही एडवोकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांच्याकडे अपील दाखल केले होते.

अपिलाच्या सुनावणीच्या वेळेस एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात आरोपींनी मयतास आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा कोणताही पुरावा सरकार पक्षाने शाबित केलेला नाही, तसेच मयताने लिहिलेली चिठ्ठी ही विश्वासार्ह नसल्याचा युक्तिवाद मांडला, तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपींना झालेली शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्त केले.

यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे, ऍड विनोद सूर्यवंशी, ऍड दत्ता गुंड ,ऍड अमित सावळगी तर