मा.पोलीस आयुक्त श्री. डॉ. राजेंद्र माने सो. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ) श्रीमती वैशाली कडुकर व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१-श्री संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजन माने व सपोनि / रोहीत चौधरी यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत व सोलापुर शहरातील सराईत गुन्हेगार यांचा शोध घेतला असता गुन्हे प्रकटीकरण पथकाला बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नाव सईद तांबोळी रा. घरकुल, सोलापुर हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्याकरीता ग्राहक शोधत आहे.

त्यावरुन त्यास ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ४६९/२०२२ भादवि कलम ३७९ या गुन्हयाची कबुली दिली सदर आरोपीताकडे अधिकची चौकशी केली असता त्यांने त्यांचा साथीदार दिपक बैकुंठ श्रीगण रा.घरकुल सोलापुर असे दोघांनी मिळून सोलापुर शहर, उस्मानाबाद जिल्हा तसेच कर्नाटक राज्यात देखील विविध ठिकाणाहून मोटार सायकल चोरी केले बाबत सांगितले आहे. सदरचा आरोपी हा अभिलेखावरील असुन यावर्षी ही मोटार सायकल चोरीच्या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली होती.

नमुद आरोपीत यांच्याकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले असुन ०९ मोटार सायकल हस्तगत करण्यात आले आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री डॉ.राजेंद्र माने सो. पोलीस उप-आयुक्त श्रीमती वैशाली कड़कर व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजन माने तसेच सपोनि / रोहीत चौधरी, पोहेकॉ/ १२७ राकेश पाटील, पोना/ १२६६ सचिन भांगे, पोना/२७५ चेतन रूपनर, पोना/२७३ मंगेश गायकवाड, पोकों/ १६६४ अमोल यादव, पोकों / १५८७ शंकर बाळगी, पोकॉ/१४८३ काशीनाथ वाघे, पोकॉ/ ४३२ अनुमान दुधाळ, पोकों / १४६७ शैलेश स्वामी, पोकों/ १०५९ सचिन जाधव, पोकों/२६६९ मोहसीन शेख, पोकॉ/ ६५५ इकरार जमादार, पोकों / ७४४ नवनाथ लोहार यांनी बजावली.