ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रानबा गायकवाड यांचे मोठे बंधू अनुरथ यादव गायकवाड यांचे आज शनिवार रोजी पुणे येथे सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांच्यावर उद्या सकाळी आठ वाजता शांतीवन स्मशानभूमी भीम नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनुरथ गायकवाड हे फुले, शाहू ,आंबेडकर, चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचे योगदान राहिले आहे. पुणे येथे अल्पशा आजाराने आज शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचे निधन झाले.
रविवारी सकाळी अंत्यसंस्कार अनुरथ गायकवाड यांच्या पार्थिवावर उद्या रविवार सकाळी आठ वाजता भिम नगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षे होते.