राज्यातील सत्ता संघर्षामुळे घसरत चाललेला राजकारणाचा दर्जा वाढविण्याची जबाबदारी सर्वस्वी लोकप्रतिनिधींची आहे, मग सत्ता कुणाचीही असो असे विधान अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्ताने अंतिम आठवडा प्रस्तावावर त्या बोलत होत्या. त्यावेळी विधिमंडळाच्या पायरीवर झालेल्या गोधळाकडे त्यांनी लक्ष वेधले.राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेदिवस बिघडत चालली आहे.
ज्यावेळी नवीन सरकारचे दोन मंत्री राज्यात कार्यरत होते, तेव्हापासून महिला अत्याचार व अन्य गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. अगदी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सतेवर आल्याचा कांगावा करणाऱ्या सरकारच्या महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे बिलकीस बानो प्रकरणातील आरोपींनामुक्त करणे ही हिंदुत्ववाची खरी बदनामी आहे. असे ठाकूर यांनी सभागृहात स्पष्ट केले. आम्हाला काँग्रेस पक्षाने संयम शिकवला आहे. सर्वधर्मसमभाव शिकवला आहे. असेही माजी पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर त्या म्हणाल्या.