नांदुरा: दि.२७.वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा बुलढाणा यांच्यामार्फत नांदुरा तालुक्यामध्ये युवकांचा कार्यसंवाद मेळावा व बैठक दि.२७ ऑगस्ट रोजी मान. जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे यांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडली. सदर कार्यक्रमांमध्ये नांदुरा तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेशभाऊ चौकशे जिल्हाध्यक्ष
अनिल वाकोडे -युवा जिल्हाध्यक्ष
अतिष भाई खराटे-जिल्हा महासचिव,
विलास भाऊ तितरे-माजी तालुका अध्यक्ष, डॉ. जमिरोद्दीन जिल्हा कार्याध्यक्ष, सूपडाजी बांगर जिल्हा उपाध्यक्ष, पवन तेलंग जिल्हा सदस्य, नागसेन खंडेराव जिल्हा उपाध्यक्ष, सचिन राऊत जिल्हा महासचिव,
यांनी युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. वंचित बहुजन युवक आघाडी तालुका व शहर पदाधिकारी अर्ज यावेळेस भरून घेण्यात आले .सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन जाधव, मेजर रतन डोंगरदिवे, अजबराव गाडे, राष्ट्रपाल सपकाळ, धम्मपाल वाकोडे, बबन वानखडे, धम्मपाल भोटकर, अमोल तायडे जिगाव, सुशील इंगळे, अनिल धुंधळे, राहुल घाटे यांनी परिश्रम घेतले.
धर्मेश तायडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली व राष्ट्रपाल सपकाळ यांनी आभार प्रदर्शन केले. वंचित बहुजन युवा आघाडी शहरात व तालुक्यात गाव खेड्या पर्यंत कशी पोहचेल याबद्दल आपले विचार धम्मपाल वाकोडे यांनी व्यक्त केले.