रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीमधील तीन आरोपीना जेरबंद करण्यास तब्बल पंधरा महिन्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड ला यश आले आहे.

   गोरेगाव पोलीस तहान हद्दीत ६ मार्च२०२१रोजी घरफोडी चा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्याचा तपास गोरेगाव पोलिसांना लावण्यास अपयश येत होते.पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांच्याकडे वर्ग करण्यात आले.

  सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस अधीक्षक अशोक दुधे,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पो.उप-निरी.महेश कदम व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते.

   स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घरफोडी मधील अज्ञात आरोपीत यांचा गुप्त बातमीदारा मार्फत माहीती काढीत प्रयत्न करून नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी अलेक्सझेंडर मरियाराज देवेंद्र, (वय-46,रा.रूम नं.12, नायगाव ईस्ट, ता.वसई, मुळ रा.पो.जनवेल्ली,ता.उच्चपुल्ली, जि.रामनाड,रा.तमीळनाडू) ,मकसुद मोहम्मद मुकादम,( वय-40, रा.जसनाईक मोहल्ला, भोस्ते, ता.खेड, जि.रत्नागीरी,), रहमतुल्ला इब्राहीम डावरे, (वय-55, रा.दहीवली, ता.माणगाव, जि.रायगड) यांना अटक करून त्यांचेकडुन चोरीस गेलेले २८७.५ ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने व २६००/-रूपये रोख रक्कम असा एकुण ९५५१३५/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याची टक्केवारी ही ८७ इतकी आहे.त्याचप्रमाणे सदरचे आरोपी यांच्याकडून

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.१७/२०२१, भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे,कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.२६९/२०२१, भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे, कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.२८५/२०२१, भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे,कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.२९३/२०२१, भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे, कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.३१३/२०२१, भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे,कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.२५२/२०२१, भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे केलेले गुन्हे उघडकीस आणण्यास यश संपादन केले आहे.

अलेक्सझेंडर मरियाराज देवेंद्र ह्या आरोपीविरुद्ध कांदीवली वेस्ट,दहिसर वेस्ट,ए.पी.एम.सी. ठाणे,रोहा पो.ठाणे,माहीम पोलीस ठाणे,वडाळा पोलीस ठाणे,एन.एम.जोशी मार्ग,चेंबूर पोलीस ठाणे,खालापूर पोलीस ठाणे आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.तर मकसुद मोहम्मद मुकादम याच्याविरोधात 

शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ, ठाणे येथे एक गुन्हा दाखल आहे.सदरचे आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरूध्द अनेक पोलीस ठाणेकडे अशा प्रकारे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे ,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पो.उप-निरी.महेश कदम , चालक सहा.फौजदार देवराम कोरम, पोलीस हवालदार राजेश पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, पोलीस हवालदार प्रतिक सावंत, पोलीस हवालदार राकेश म्हात्रे, तसेच सायबर सेल नेमणूकीतील पोलीस नाईक तुषार घरत, पोलीस नाईक अक्षय पाटील यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आले.