वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत विविध विकास कामांचा शुभारंभ.
उपसरपंच महेंद्र भाडळे,समीर भाडळे यांच्या स्वखर्चातून विकास कामे.
वाघोली /प्रतिनिधी
नितीन शिंदे
वाघोली (ता.हवेली) येथील मा. जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपसरपंच महेंद्र भाडळे व समीर भाडळे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रमावरील अनावश्यक खर्च टाळून विविध विकास कामांचा शुभारंभ (दि. २५,२६)ऑगस्ट रोजी करण्यात आला.
वाघोली गावातील मॅनहॅटन फेज२,मॅनहॅटन ओएसेस-१, ऐश्वर्या लक्ष्मी या ठिकाणी हायमास्ट दिवे व वृक्षारोपण, त्याचबरोबर जेएसपीएम कॉर्नर, न्याती ऐलान सोसायटी ते जेएसपीएम कॉलेज गेट.बकोरी रोड ते ड्रीम संकल्प सोसायटी प्रत्येकी १५ स्ट्रीट लाईट पोल. ऑक्सी अल्टिमा, एंकाई सोसायटी व बाईक रोड ते आयरिस सोसायटी या विविध ठिकाणी एकूण पंधरा स्ट्रीट लाईट पोल, केसनंद रोड ते हिलशायर सोसायटी त्या ठिकाणी दहा १० स्ट्रीट लाईट पोल बसविण्याचा शुभारंभ वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या हस्ते झाला.
यावेळी मा.जि.प सदस्य रामदास दाभाडे,मा.उपसरपंच महेंद्र भाडळे,मा.उपसरपंच समीर भाडळे, संदेश आव्हाळे, यांच्यासह विविध सोसायटी धारक आणि महेंद्र भाडळे समीर भाडळे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.