बीड (प्रतिनिधी) कामखेडा ता.जि.बीड येथील बौद्ध समाजातील नऊ आणि मुस्लिम समाजातील आठ युवकांवर दाखल झाले होते अट्रॉसिटी सह इतर स्वरुपाचे गंभीर गुन्हे,त्यामुळे दोन्ही हि समाजातील लोकांनी उग्र स्वरूप धारण केले होते,त्यामुळे तर माघार घेण्याचा विषयचं नव्हता अर्थात याला दोन्ही समाजातील काही कार्यकर्त्यांचे खतपाणी होतेचं.

याप्रकरणी किशन तांगडे यांच्या सह कर्तव्यदक्ष DYSP संतोष वाळके,पोलीस निरीक्षक संतोष साबळे,पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे,डॉ.ओव्हाळ यांनी बीड येथे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गावातील दोन्ही समाजातील लोकांसह गावातील काही प्रतिष्ठित नागरिका आणि जवळपास शंभर,दिडशे लोकांची बैठक घेतली.त्याचे झाले असे चार/पाच दिवसां पूर्वी कामखेडा ता.जी.बीड बौद्ध समाजातील अक्षय वाघमारे आणि अरुण ओव्हाळ यांनी आणि इतर काही युवकांनी गावातीलच मुस्लिम समाजातील अजीम शेख यांच्या शेतातील तन/गवत काढण्याचे काम घेतले होते.

काम झाल्या नंतर ते कामाचे पैसे मागण्यास अजीम शेख कडे रात्रीच गेले,तर अजीम शेख यांनी त्यांना बाराशे रु.दिले,यावर ते तरुण म्हणाले की,आम्ही बाराशे नाही तर बारा हजार रु.मध्ये तुमचे काम घेतले होते,यावरूनच त्त्यांच्यात तू तू मै मै होऊन शिवीगाळ व मारहाण झाली.

त्याच रात्री किशन तांगडे यांना विजय ओव्हाळ चा फोन आला व म्हणाला गावात असा नी असा विषय झाला आहे,त्यावेळी किशन तांगडे हे त्याला म्हणाले की, विजय गावातील विषय आहे,सकाळी बसून मिटवून घ्या,यावर दोन्ही हि पार्ट्या तयार झाल्या व सकाळी बसून मिटविण्याचे ठरले.

त्या प्रमाणे ते बसले आणि बोलत बोलतच त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली,एवढेच नाही तर दोन्ही गटात यावेळी तुंबळ मारहाण होऊन यात बरेच जण जखमी झाले.या घटनेत अट्रॉसिटी सह दोन्ही बाजूने गंभीर गुन्हे दाखल झाले.त्या दिवशी दोन्ही बाजू कडील लोकांना राग असल्यामुळे त्या दिवशी कोणी काहीच बोललं नाही.

दुसऱ्या दिवशी किशन तांगडे यांनी या घटने संदर्भात कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके,पोलीस निरीक्षक संतोष साबळे आणि पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे (या प्रकरणी योगेश उबाळे यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले.) यांच्याशी चर्चा केली,त्या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि किशन तांगडे यांना म्हणाले तांगडे तुम्ही पुढाकार घ्या आम्ही तुम्हाला सर्व सहकार्य करतोत.

मग या प्रकरणी दोन्ही बाजू कडील लोकांना बोलणे झाल्या नंतर रात्री ठिक नऊ वाजता ग्रामीण पोलीस स्टेशन बीड येथे कामखेडा गावातील काही प्रतिष्ठित आणि जवळपास शंभर ते दिडशे लोक आणि काही बौद्ध व मुस्लिम समाजातील लोकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.या बैठकीस किशन तांगडे आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले,यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.जितेंद्र ओव्हाळ,तंटामुक्तीचे अध्यक्ष राजू पटेल आणि जेष्ठ नेते गणेश नेवडे यांनी काही उपयुक्त सूचना सुचविल्या."164"अंतर्गत दोन्ही कडील लोकांचे जबाब घेऊन आणि सर्वांची गळा भेट घेऊन या वादावर पडदा पाडला.

बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या मुळे चांगला संदेश जाऊन सामाजिक सलोखा राखण्यास मदतच होईल हे मात्र खरे.या बैठकीस किशन तांगडे, पोलीस निरीक्षक संतोष साबळे,उपनिरीक्षक योगेश उबाळे,सामाजिक कार्यकर्ते डॉ.जितेंद्र ओव्हाळ,भैय्यासाहेब मस्के,रतन वाघमारे,विजय ओव्हाळ,विनोद शेजवळ,राजू पटेल,गणेश नेवडे,राजेश कांबळे,शेवराव नेवडे,राजेंद्र वाघमारे,अक्षय खेमाडे,कैसर भाई बेग सह बौद्ध आणी मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्ते आणि गावातील जवळपास दीडशे लोकांची उपस्थिती होती.