यावेळी गरजू रुग्णांना १ कोटी ९५ लक्ष रुपये वैद्यकीय मदत देणे, पॅरामेडिकल स्टाफची पगारवाढ करणे आणि स्वाईन फ्लु व कोविडसाठी स्वतंत्र आयसोलेशन वार्ड बनवणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थानमध्ये चोरी करणाऱ्यांची गय करू नका अशा सूचना यावेळी नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी दिल्या. श्री साईबाबा मंदिरात भाविकांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या संख्येमुळे दर्शन घेण्यास येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बनवण्यात येत असलेल्या नवीन दर्शन रांगेचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे भाविकांचे दर्शन अधिक चांगले होण्यास मदत होणार आहे.
श्री.साईबाबा समाधी मंदिरात हार - फुले नेऊ नये याचा निर्णय मागील कमिटीने घेतला होता. शिर्डी परिसरात हार - फुले विकण्याच्या नावाखाली अनेक वेळा भाविकांची लूट केली जाते व त्यामुळे शिर्डीचे नाव बदनाम होत असून हार - फुले मंदिरात नेण्यास बंदी कायम ठेवावी असे निवेदन सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने विश्वस्त मंडळाला देण्यात आले आहे. अशा अनेक तक्रारी भाविकांनी विश्वस्त मंडळातील सदस्यांकडेही केल्या आहेत. त्यामुळे हार - फुले नेण्याबद्दल सर्वपक्षीय ग्रामस्थ व भविकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे यावेळी नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार स्व. विनायकजी मेटे व साकुरीचे सरपंच स्व. राजेंद्रजी दंडवते यांना श्रद्धांजली वाहुन बैठकीला सुरुवात करण्यात आली.यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. जगदीशजी सावंत, विश्वस्त मा.श्री. जयंतजी जाधव, मा.श्री. एकनाथजी गोंदकर, मा.श्री. अविनाशजी दंडवते, मा.श्री. सचिनजी गुजर, मा.श्री. महेंद्रजी शेळके, मा.श्री. सुहासजी आहेर, मा.श्री. सुरेशजी वाबळे, मा.श्री. सुनीलजी शेळके, मा.श्री. जालिंदरजी भोर, मा.श्री. सचिनजी कोते, मा.श्री. दत्तात्रयजी सावंत, मा.श्री. सुभाषजी लाखे, आदींसह कु. अनुराधाताई आदिक, मा.श्री. राहुलजी कनाल, व मा. मीनाताई कांबळी व्हीसीद्वारे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.