संत सेना महाराज मंदीराला निधी कमी पडून देणार नाही - आ.सुरेश धस
पाटोदा (प्रतिनिधी) नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या मंदीराचे भुमिपुजन समारंभ शुक्रवार दि.२६/८/२०२२ रोजी दुपारी १ वाजता बीड लातूर उस्मानाबाद विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांच्या शुभहस्ते ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापु महाराज यांच्या उपस्थित पाटोद्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार सुरेश धस बोलताना मटले संत सेना महाराज मंदीर कामाला निधी कमी पडून देणार नाही तसेच प्रभाग नऊ माळेगल्लीतील सर्व प्रश्न सोडु व पाटोदा शहरात लवकर फिल्टर पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू करुण पाटोदा शहरातील नाल्याचे प्रश्न सोडवण्या साठी सर्व नगरसेवकानी आपआपल्या भागातील कामाची यादी पाठवावी जेणे करून शहरातील सर्व नाल्या व इतर कामे मार्गी लागतील घरकुला मध्ये मी राजकारण केले नाही उलट सर्व सामान्याना घरकुल दिले आशेही सांगितले कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती नगरसेवक सय्यद अब्दुल्ला,प्रथम नगराध्यक्ष बळीराम पोटे, उपाध्यक्ष,सभापती,सर्व नगरसेवक यांच्या सह माजी सभापती महेद्र गर्जे,अंमळनेर गटाचे नेते भाऊसाहेब भवर,माजी पंचायत सभापती केशव रसाळ,सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिपक तांबे,यांच्या सह आमदार सुरेश समर्थक व संत सावता महाराज मंडळ व संत सेना महाराज मंडळा माळीगल्ली पाटोदा येतील कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामश्वेर गोरे यांनी केले तर आभार कल्याण खडागळे यांनी मानले