काद्राबाद येथे गावठाण फिडर अंतर्गत २४ तास वीज मिळावी- शिवसेनेचे अमोल ढगे यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.

"तात्काळ हे प्रश्न मार्गी लावा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपानजी भुमरे यांचा प्रशासनाला आदेश"

पाचोड(विजय चिडे)काद्राबाद ता.औरंगाबाद येथे गावठाण फिडर अंतर्गत २४ विज पुरवठा करणे.खोडेगांव ग्रुप ग्रामपंचायत अतंर्गत लांडकवाडी येथील पांगरा वस्तीला गावठाण फिडर अंतर्गत २४ तास विज पुरवठा करणे. जोडवाडी,बेंबळाचीवाडी शिवार गट नं.६६ येथील शेतकर्यांना तात्काळ शेतीसाठी रोहित्र देण्यात यावे.

 या तिन्ही मागण्यासाठी शिवसेनेचे उपतालूका प्रमुख अमोल ढगे शेकडो गावकऱ्यांनी कार्यकारी अभियंता ढाकणे यांना निवेदन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून काद्राबाद येथील गावकरी विजे अभावी त्रस्त आहे.येथील गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासून हा प्रश्न लावून धरला होता पण याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत होते.वेळोवेळी पाठपुरावा करुनही या गावाचा प्रश्न सुटला नाही.त्यांना विजेअभावी अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे.अखेर येथील गावकऱ्यांनी शिवसेनेचे उपतालूका प्रमुख अमोल ढगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लगेच गावकऱ्यांना घेऊन प्रशासनाला निवेदन दिले आणि सागितले की,जर १४ तारखे पर्यंततिन्ही गावाचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा 14/09/2022 रोजी बेमुदत अन्नत्याग उपोषण व बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल.कार्यकारी अभियंता यांनी लवकरात लवकर तुमचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.यावेळी अमोल ढगे,इसाक पठाण,काद्राबादचे सरपंच मुनीर पटेल,उपसरपंच विजयसिंग नायमने,भगवान ढगे,केसरसिंग डोभाळ,दादाराव सरोसे,अफरोज सय्यद,ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब नागरे,तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष अजीम सय्यद आंदीची उपस्थिती होती.

सोबत फोटो

कार्यकारी आभीयंता यांना निवेदन देतांना उपतालुका प्रमुख आमोल ढगे सह ग्रामस्थ..

रोहयो मंञी संदिपान भुमरे यांना निवेदन देतांना उपतालुका प्रमुख आमोल ढगे सह ग्रामस्थ