शेतकऱ्यांच्या सर्वात मोठा असलेला बैलपोळा या सणा निमित्त वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी सहपरिवारा सोबत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सरला बेटावर मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत बैलपोळा साजरा केला.
दरम्यान, येलम वस्तीवर श्रमदानासाठी आलेल्या महिला व बेटावरील भक्त परिवार यांच्या समवेत बैलजोडीचे आमदार बोरणारे यांनी पूजन केले. यावेळी हभप मधुकर महाराज, भाऊसाहेब महाराज, संजय बोरणारे, संगीता बोरणारे, वर्षा बोरणारे तसेच भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.