डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत गीताई ह्यूमनकाइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा येथील विद्यार्थिनी कु. प्रियंका गजानन पाटील आणि कू.साक्षी राजेंद्र वैराळकर यांनी नागरतास येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुरक्षित फवारणी बाबत घेण्यात येणाऱ्या योग्य काळजी बाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.  सुरक्षित फवारणी बाबत प्रात्यक्षिक कार्यक्रम नुकताच येथे घेण्यात आला असून फवारणी करिता शेतकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा वापर करावा ,गढूळ पाण्याचा वापर केल्यास औषधावर विपरीत परिणाम होऊन औषधाची शक्ती कमी होते. त्यामुळे किटकांचा नाश करण्यासाठी आवश्यक परिणाम साधता येते नाही. तसेच औषधी फवारणी करीत असताना शेतकऱ्यांनी तोंडावर मास्कक, डोळ्यावर चष्माा, हातात हातमोजे चढवूनच फवारणी करावी ,असे मार्गदर्शन करून येथील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकही करून दाखविले.याप्रसंगी नागरतास येथील अनेक शेतकरी उपस्थित होते. 

या प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थीनींना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस ‌.एम .जाधव, प्रा. प्रदीप निचळ, कार्यक्रम समन्वयक विषय तज्ञ सुमेध मनवर, शशिकांत वाकुडकर आणि ए. के.वाघ, कार्यक्रम अधिकारी डॉ .करंगामी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.