शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा येथे एका युवकाला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वैभव खरपुडे, दिपक चहाळ, आकाश ढमढेरे या तिघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा येथे राहणाऱ्या वैभव खरपुडे याची दुचाकी संतोष झिणे त्याच्या नातेवाईकाने गावी नेलेली होती, वैभव याने माझी दुचाकी कोठे आहे असे विचारले असताना संतोष याने तुझी दुचाकी आमच्या पाहुण्याने गावी नेलेली आहे असे सांगितले, मात्र संतोषने दुचाकी पाहुण्याला दिली या कारणातून वैभव व त्याच्या दोन साथीदारांनी संतोष याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली, दरम्यान संतोषची पत्नी मध्ये आली असता तिला देखील शिवीगाळ, दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली, याबाबत संतोष भगवान झिणे वय ३२ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी वैभव खरपुडे, दिपक चहाळ दोघे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे, आकाश ढमढेरे ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध शिवीगाळ, दमदाटी, मारहाण सह जातीवाचन शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरुर उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी व पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहे.