मेहकर: दि.२६. सारशिव येथील सरपंच सौ. रमाबाई दादाराव जाधव यांच्याविरुद्ध गट नंबर ११४ मध्ये ५० आर जमिनीवर अनधीकृतपणे अतिक्रमण केले अशी तक्रार केली होती.
सविस्तर वृत्त असे की.मेहकर तालुक्यातील सारशिव येथील विनोद संभाजी जाधव, कन्हैयालाल राजाराम मोरे, पंकज उद्धव वाघ यांनी तक्रारीत रमाबाई दादाराव जाधव यांनी अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे असा अर्ज अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता. त्यामध्ये रमाबाई जाधव या ग्रामपंचायत सदस्य असून त्यांच्या पतीने शासकीय जागेवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले आहे. शिवाय ग्रामपंचायत सदस्य या घरात एकत्र राहत असून शासकीय जागेवर अतिक्रमण केले असून या जमिनीचा उपभोग घेत आहे. त्याबाबत महसूल विभागाने त्यांना दंड सुद्धा आकारला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य जाधव यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी केली होती. याप्रकरणीय अप्पर जिल्हाधिकारी संबंधितांना नोटीस बजावून बाजू मांडण्याची संधी दिली. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी ग्रामपंचायत नमुना आठ नुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीला रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून ते घरकुलाचे बांधकाम नियमाकुल झाल्याचे दिसून आले. सदर जमीन हे गुलाबचंद मारवाडी यांचे नावे आहे. त्यामुळे गैर अर्जदार सौ.रमाबाई जाधव यांचे सरपंच पद कायम ठेवण्यात आले आहे. तर अर्जदार विनोद जाधव, कन्हैयालाल राजाराम मोरे, पंकज उद्धव वाघ, यांचा अर्ज फेटाळण्यात( नामंजूर) आला आहे.सदर निकाल दि.२३ ऑगस्ट २०२२ रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी नुकताच दिला असून सौ. रमाबाई जाधव या सारशिव गावच्या सरपंच पदी कायम करण्यात आले आहे.