सायकल चोरट्यास अटक करून नऊ सायकली हस्तगत

वाशिम शहरातील कोचिंग क्लासेस समोरून सायकली चोरी करणा - या आरोपीला अटक करून व त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण ९ सायकली किंमत रु .७०,००० / - हस्तगत केल्या आहेत . याबाबत सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी नामे रविंद्र सुभाष दहापुते , वय ४३ वर्षे , धंदा- डॉक्टर , रा . इन्नानी पार्क , सिव्हील लाईन , वाशिम यांनी दि . २४ऑगस्ट रोजी पो.स्टे . वाशिम शहर येथे येउन फिर्याद दिली की , दि . २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०४:३० वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी कु . मनस्वी रविंद्र दहापुते ही व्यंकटेश कॉलनी , बस स्टॅन्ड चे मागे , सायन्स क्लब कोचिंग क्लासेस येथे तिची रेंजर ' कंपनीची सायकल घेउन कोचिंग क्लास करिता गेली होती व कोचिंग संपल्यानंतर सायंकाळी ०५:४५ वाजताच्या सुमारास तिची सायकल तिने ठेवलेल्या ठिकाणी आढळून आली नसल्याने तिच्या लक्षात आले की , तिची सायकल चोरीस गेली आहे . त्याचवेळी तिच्या टयुशन क्लासमध्ये सोबत असलेली तिची मैत्रिण नामे कु .श्रध्दा संतोष गोटे हिची सुध्दा ' हर्क्यूलस ' कंपनीची सायकल सुध्दा चोरीस गेली आहे . त्यानंतर फिर्यादी रविंद्र सुभाष दहापुते हे फिर्याद देण्यासाठी पो.स्टे . ला आले असता त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पो . स्टे . वाशिम शहर अप.क. ६६२ / २०२२ , कलम ३७९ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रफीक शेख यांनी सदर गुन्हयाच्या तपासाबाबत डि.बी. पथकास आदेश देउन रवाना केले असता डि.बी. पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे आमीर खान एजाज खान पठाण , वय ३० वर्षे , धंदा - मजुरी , रा . सवेरा कॉलनी , गोटे कॉलेज समोर , वाशिम यास हिंगोली नाका , वाशिम येथून ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली व त्याच्याकडे केलेल्या चौकशीत माहिती दिली की , त्याने वाशिम शहरातून वेगवेगळया कोचिंग क्लासेस जवळून एकूण ९ सायकली चोरलेल्या आहेत . नमूद आरोपीकडून एकूण ९ सायकली , किंमत अंदाजे ७०,००० / - रू . हस्तगत करण्यात आल्या असून त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक बच्चन सिंह , अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे , उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार रफीक शेख यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि खंदारे , पो.ह.क्र . ३४७ / लालमणी श्रीवास्तव , पो.ह.क. ६७७ / सखाराम वंजारे , पो.ना.क. ८५६ / रामकृष्ण नागरे , पो.ना.क. २१० / मात्रे , पो.शि.क. २४३ / विठ्ठल महाले , पो.शि.क. ४९५ / अनिल बोरकर यांनी पार पाडली आहे . पोलीस स्टेशन वाशिम शहरकडून शहरातील पालकांना आवाहन करण्यात येते की , ज्यांच्या ज्यांच्या पाल्यांच्या सायकली चोरीस गेल्या आहेत त्यांनी न्यायालयाकडून परवानगी घेउन पावती दाखवून आपापल्या सायकली घेउन जाव्यात .