पाचोडसह परिसरात पोळा संण उत्साहात साजरा

पाचोड(विजय चिडे) पाचोडसह ता.पैठण परिसरात पोळ्याचा सण शांततेत आणि त्साहात साजरा करण्यात आला.वर्षभर शेतात राबणा-या सर्जा-राजाला (बैलांना) सजवून पाचोड,मुरमा,लिबगाव,पाचोड खुर्द,थेरगाव,दादेगाव,दांडगा राजंगाव,हर्षी,सोनवाडी,आडगाव,आतंरवाली,रजापुर गावाच्या वेशीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात गेले दोन वर्षापासून शेतकरी कोरोणाने हैराण झाला होता.मात्र यंदा पोळा संणावरील सर्व निर्बध उठविले असल्याने पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

यंदा खरिपाची पेरणी वेळेवर झाले त्यामुळ बळीराज्याचे कपाशी, मुग, सोयाबीन सारखे पिके सध्या चांगली जोमात आहे.पोळा हा सण साजरा करण्यासाठी शेतकर्‍यांच्या खिशात दमडी देखील नसतांना शेतात रात्रंदिवस राबणार्‍या सर्जा-राजाला (बैलांना) सजावट करून पुरणपोळी खाऊ घालायला शेतकरी मागेपुढे पाहीले नाही. परिस्थिती तंगीची असली तरी शेतकरी बैल "पोळा" सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. आदल्या दिवशी खांदेमळणी यानंतर पोळा आणि तिस-या दिवशी पाडवा सण साजरा केला जातो.याच्या दिवशी विविध ठिकाणी बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती.पोळा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्याची पध्दत आहे.गावातील मारुती मंदिराजवळ सर्व शेतक-यांनी बैलांना सजवून आणले होते. या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोड पोलिस ठाण्यांचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुरेश माळी,पोलिस उपनिरिक्षक सुंशात सुतळे,बीट जमादार पवन चव्हाण,जगन्नाथ उबाळे,पवन चव्हाण,संदीप पाटेकर,सुधाकर मोहीते,रविंद्र आंबेकर,किशोर शिंदे,आण्साहेब गव्हाणे सह पोलिस कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

फोटो कॅप्शन-

वर्षभर शेतात राब राब राबणार्‍या सर्जा-राजाला शेतक-यांनी सजवून त्यांची मनोभावे पूजा करीत मिरवणूक काढली तर महिलांनी औक्षण केले.(छाया-विजय चिडे,पाचोड)