पुणे रेल्वे पोलिसांनी पारधी समाजाचा तरुण चोरीच्या संशयावरून पीसीआर मध्ये हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना पुणे रेल्वे स्टेशनला घडली आहे. 25 वर्षांचा नागेश पवार असे तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील आणि त्याला अमृत महोत्सवी दिनी 15 ऑगस्ट ला अटक केली आणि न्यायालयाने 6 दिवसाची पिसिआर दिला या पिसीआर दरम्यान एवढी भयानक मारहाण झाली की काल नगेशच हत्याकांड झालं. आता पुणे ससून रुग्णालय येते त्याचा मृतदेह आहे, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अट्रोसिटी ॲक्ट 302 अंतर्गत कार्यवाही झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भुमिका कुटुंबाने घेतली आहे. आजही पारधी समाज केवळ संशयावरून मारला जातो. इंग्रजांनी चोर जमात म्हणून शिक्का मारून गेलेली जमात जर स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी मारली जात असेल तर आम्ही इंग्रजांची गुलामी सोडली का? आदिवासी समूहाचे पारधी समाजाचे स्वातंत्र्य कुठंय? तात्काळ पोलीस अधिकारी, तपास अधिकारी, फिर्यादी सर्वांवर 302, अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करावी. जयभीम फिल्म या देशात मोठ्या प्रमाणात चालली. त्यातला प्रती जयभीम नागेश पवार चा झालेला आहे.
सदर घटने प्रकरणी पुणे शहर-जिल्हा प्रभारी मा.प्रा. किसन चव्हाण यांच्या सूचनेनुसार ताबडतोब वंचित बहुजन आघाडी पुणे शहर महासचिव मा.ऍड. अरविंदजी तायडे, प्रवक्ते मा. निरंजन कांबळे, प्रभाग क्र. २६ निरीक्षक मा. अभिजित बनसोडे, प्रभाग क्र. १० निरीक्षक मा. ओंकार कांबळे, तसेच मा. कृष्णा मोरे आदी पदाधिकारी यांनी पुणे पोलिस आयुक्त कार्यालय येथे मयत नागेश पवार यांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुणे पोलिस आयुक्त साहेब यांना निवेदन दिले.