भामटे (ता. करवीर) येथे मंगळवारी रात्री घरात अंथरुणात झोपी गेलेल्या चिमुरडीला विषारी नागाने दंश केल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ज्ञानेश्वर सचिन यादव (वय ११) असे या मुलीचे नाव आहे. तिची आई नीलमलाही या नागाने दंश केला आहे; पण तिच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.