पोलीस दलात कर्तव्य बजावतांना पोलीस अधिकारी व अंमलदारांनी स्वतःच्या शारीरिक तंदरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. सुदृढ, निरोगी व निकोप जीवन जगण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळांना अनन्यसाधारण महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे अठरावि ‘वाशिम जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा – २०२२’चे आयोजन दि.२३ऑगस्ट ते दि.२५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मैदानी खेळ ,वैयक्तिक व सांघिक स्वरुपात तसेच अॅथलेटीक्स क्रीडा प्रकारातील विविध खेळांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातील ४५ पुरुष व २२ महिला पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.२५ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा वितरण व समारोप समारंभ नवीन पोलीस मुख्यालय, वाशिमच्या कवायत मैदानावर दिमाखदार पद्धतीने पार पडला. दि.२३.०८.२०२२ पासून सुरु झालेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये अॅथलेटीक्स क्रीडा प्रकारात १०० मिटर धावणे – प्रथम क्रमांक-अमोल काचेवाड, द्वितीय क्रमांक-प्रदीप बोडखे, २०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक-प्रदीप बोडखे, द्वितीय क्रमांक-प्रभू जुमडे, ४०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक-आकाश पाईकराव, द्वितीय क्रमांक-फकीर परसूवाले, ८०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक-अमोल काचेवाड, द्वितीय क्रमांक-गणेश भिसे, १५०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक-रमेश बोरकर, द्वितीय क्रमांक-गजानन चौधरी, भालाफेक(पुरुष) – प्रथम क्रमांक-शेरू गारवे, द्वितीय क्रमांक-बब्बू पटेल, भालाफेक(महिला) – प्रथम क्रमांक-शबनम नंदावाले, द्वितीय क्रमांक-पोर्णिमा मोटे, गोळाफेक(पुरुष) – प्रथम क्रमांक-समीर खान, द्वितीय क्रमांक-राजेंद्र चव्हाण,गोळाफेक(महिला) – प्रथम क्रमांक-निलोफर शेख, द्वितीय क्रमांक-पोर्णिमा मोटे, थाळीफेक(पुरुष) – प्रथम क्रमांक-समीर खान, द्वितीय क्रमांक-समाधान भालेराव, थाळीफेक(महिला) – प्रथम क्रमांक-निलोफर शेख, द्वितीय क्रमांक-शारदा चौधरी, लांबउडी(पुरुष) – प्रथम क्रमांक-नागनाथ देवळे, द्वितीय क्रमांक-संतोष राठोड, लांबउडी(महिला) – प्रथम क्रमांक-गंगा राठोड, द्वितीय क्रमांक-गंगा मनवर यांनी विजेतेपद पटकाविले.तर सांघिक क्रीडा प्रकारात फुटबॉलमध्ये पोलीस मुख्यालयाचा संघ प्रथम स्थानी तर मंगरूळपीर उपविभागाचा संघ द्वितीय स्थानी, व्हॉलीबॉलमध्ये कारंजा उपविभाग प्रथम तर मंगरूळपीर उपविभाग द्वितीय स्थानी, बास्केटबॉलमध्ये वाशिम विभाग प्रथम स्थानी तर पोलीस मुख्यालय द्वितीय स्थानी, *कबड्डीमध्ये पोलीस मुख्यालय प्रथम स्थानी तर वाशिम विभाग द्वितीय स्थानी राहिला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अमोल काचेवाड या खेळाडूस ‘उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून गौरविण्यात आले.स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी बक्षीस देऊन अभिनंदन केले व ‘पोलीस दलामध्ये तणावपूर्ण परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना सर्वांनी स्वतःच्या मानसिक व शारीरिक स्वास्थाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे’ असे सांगितले. सदर क्रीडा स्पर्धा पोलीस अधीक्षक  बच्चन सिंह व अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांगीलाल पवार, रा.पो.नि.मुख्यालय, वाशिम, रा.पो.उपनि. राठोड, सोळंके व सर्व कवायत निर्देशक, पोलीस मुख्यालय, वाशिम व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेऊन उत्साहात पार पाडल्या.