एस एम सेहगल फाउंडेशन च्या माध्यमातून निधोना येथे लिंग समानता आणि पंचायत राज मधील महिलांची भूमिका या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्त्री पुरुष समानतेवर चर्चा घडावी व पंचायतराज च्या माध्यमातून शाश्वत विकासामध्ये महिलांचा सहभाग वाढावा हा या कार्यशाळेचा उद्देश होता.
विविध खेळ, गट कार्य, आणि सत्रांच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून फुलंब्री च्या बाल विकास अधिकारी मनीषा कदम, उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापक विजय काथार, प्रभाग समन्वयक विनोद कदम, सरपंच बिजुबाई राउतराय, सेहगल फाऊंडेशन चे प्रकल्प समन्वयक अमोल भिलंगे, अमोल सावदेकर सह गावातील देवशायनी ग्रामसंघ चे पदाधिकारी, स्वयंसहायता समूहांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या