--- मराठी पञकार संघाचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 

/ परभणी

    पुर्णा तालुक्यातील माखणी येथील पञकार जनार्दन आवरगंड यांच्यावर २३ ऑगस्ट रोजी त्याच गावाचे सरपंच गोविंद आवरगंड व इतर जणांनी मारहाण केली. 

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पञकारावर हल्ला करून सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.तरी पञकार जनार्दन आवरगंड यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक शासन करावे या मागणीसाठी पालम तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पालम तहसील दारा मार्फत जिल्हाधिकारी परभणी यांना आज दि.२५ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.

  निवेदनावर मराठी पञकार संघाचे तालुका अध्यक्ष कल्याण सिरस्कर यांच्या सह , चांद तांबोळी, गुणवंत सराफ, माधव हनवते, रामप्रसाद कदम, राहुल गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, भरत जोगदंड, अवधूत जाधव, भास्कर लांडे, आनंत पौळ, गोविंद सोलेवाड, शिवाजी शिंदे, मारोती नाईकवाडे, बालासाहेब फुलपगार, विलास चव्हाण, संदीप मुदखेडे, शेख गौसोद्दीन, आनंद साखला आदींच्या सह्या आहेत.