शिरुर: निर्वी (ता. शिरुर) येथे उत्पादन वाढीसाठी अनेक शेतकरी तंत्रज्ञान वापर करीत असुन जास्तीत जास्त उत्पादन घेत आहे. तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील उच्ततम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पिक स्पर्धा योजनेच्या माध्यमातून सन्मान हा त्यांच्या योगदानाचा सन्मान होत असुन या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री सिध्देश ढवळे यांनी निर्वी येथे केले
मुग पिक स्पर्धत शहाजी शेळके यांनी सहभाग नोंदविला असुन पिकाची काढणी करताना शेताची लांबी रूंदीला रॅण्डम टाकून अर्धा गुंठ्याचे उत्पादन किती येते हे पडताळनी केली जाते. या पडताळनी साठी गावस्तरीय कमिटी गठीत केली असुन त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच प्रगतशील शेतकरी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, व कृषी पर्यवेक्षक कृषी सहायक असुन मुग पिकाच्या काढणी दरम्यान पर्यवेक्षण अधिकारी म्हणून कृषी अधिकारी सतीश केळगंद्रे तसेच गावस्तरावरील सरपंच शोभाताई तरटे माजी उपसरपंच निलेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे, बाळासाहेब पवार, संपत सोनवणे, शहाजी शेळके, कल्पना शेळके, संजय सोनवणे सह शेतकरी उपस्थित होते
शिरुर तालुक्यात मुग बाजरी पिकासाठी पिक स्पर्धा आयोजित केली असुन तालुका पातळीवर प्रथम क्रमांकास 5 हजार, द्वितीय क्रमांकास 3 हजार आणि तृतीय क्रमांकास 2 हजाराचे बक्षीस दिले जाते. तसेच जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकास 10 हजार, द्वितीय क्रमांकास 7 हजार तर तृतीय क्रमांकास 5 हजार रुपये बक्षीस दिले जात आहे. आणि विभाग पातळीवर प्रथम क्रमांक 25 हजार, द्वितीय क्रमांक 20 हजार, तृतीय क्रमांकास 15 हजार रुपये बक्षीस दिले जाते. तर राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकास 50 हजार, द्वितीय क्रमांकास 40 हजार आणि तृतीय क्रमांकास 30 हजाराचे बक्षीस दिले जात असल्याने उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा हा गुणगौरव होत असल्याचे निलेश सोनवणे व अनिल कांबळे यांनी सांगितले. यापुढे गाव पातळीवर भविष्यात अशा पिक स्पर्धा भरविल्या जातील असे गावच्या सरपंच शोभाताई तरटे यांनी सांगितले पिक स्पर्धा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे व कृषी सहायक जयवंत भगत यांनी योगदान दिले.