शहराचे नगर भुमापन करण्या संदर्भात संबंधितांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत*

आमदार गजबेंची राज्याच्या महसूल मंञ्यांकडे मागणी

गडचिरोली(देसाईगंज-)

     अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची एकमेव मुख्य बाजारपेठेत व व्यापार नगरी असलेल्या देसाईगंज शहराचे मागील चार वर्षापासून भुमापनाचे काम रखडलेल्याने स्थानिक नागरिकांना शासकीय स्तरावरुन देण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत असलेल्या अडचणी पाहु जाता शहराच्या नगर भुमापन करण्या संदर्भात तत्काळ निर्देश देण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्दविकास मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

     दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने शहराचे नगर भुमापन करण्या करीता देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाशी पञव्यवहार केला असता भुमिअभिलेख कार्यालयाने भुमापनासाठी नगर परिषदेकडे मोजणी शुल्क ३ कोटी ४८ लाख रुपयाची मागणी केली होती.त्या अनुषंगाने नगर परिषद कार्यालयाकडून ४ जानेवारी २०१८ रोजी २ कोटी ५० लाख,६ जुलै २०१८ रोजी ३ लाख रुपये व १९ डिसेंबर २०१८ रोजी २५ लाख रुपये असे एकुण २ कोटी ७८ लाख रुपये भुमिअभिलेख कार्यालयाकडे जमा केले आहेत.

     एकुण मागणीच्या तुलनेत जमा करण्यात आलेली रक्कम ८० टक्के असुन त्याप्रमाणात भुमिअभिलेख कार्यालयाकडून अद्यापही प्रत्यक्षात नगर भुमापनाचे तेवढे काम झाले नसल्याचे दिसून येत आहे.सदर काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने शहरातील नागरिकांना प्रधानमंञी आवास योजनेचा लाभ देताना अडचण येत असुन शहरातील गरीब गरजु लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासुन वंचित राहावे लागत आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांकडून देसाईगंज शहराचे प्राधान्याने नगर भुमापन करण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांची मुख्य अडचण लक्षात घेता देसाईगंज शहराचे प्राधान्याने नगर भुमापन करण्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ निर्देश देण्याची मागणी आमदार गजबे यांनी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्दविकास मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. आमदार गजबेंच्या मागणीची दखल घेऊन मंत्रीमहोदयांनी तत्काळ अप्पर मुख्य सचिव यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याने देसाईगंज शहराच्या नगर भुमापनाचे काम लवकरच मार्गी लावण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.