गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वाघोली दि. २२ (सा. वा. ) - हवेली तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशन'च्या वतीने परिसरातील दहावी आणि बारावीतील २०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, युवासेनेचे मच्छिंद्र सातव, शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक भोसले, प्राचार्य अजिनाथ ओगले, नानासाहेब निंबाळकर, जयश्री सातव, राजेंद्र सातव, समीर भाडळे, दत्तात्रय बेंडावले, रामकृष्ण सातव आदी यावेळी उपस्थित होते.

प्रथम क्रमांक पटकाविलेल्या चार विद्यार्थ्यांना लॅपटॉप, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना टॅब, तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांना मोबाईल, चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच आणि उत्तेजनार्थ २०० विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.