थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन)पुणे सोलापूर महामार्गाची गेल्या काही वर्षापासून देखभाल व दुरुस्ती झालीच नाही परिणामी या महामार्गाची अतिशय दयनिय अवस्था झाली असून अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडवरच्या संरक्षक लोंखडी जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत तर बोरकरवस्ती जवळील पुलावर काटेरी झुडूपे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. महामार्गावरील दोन्हीही बाजुच्या एक मार्गिकेवर माती तसेच वाळूचे थर दुभाजकाच्या कडेला साचले आहेत दुभाजकावर लावलेले लाईट बेरिअरची तर अवस्था अतिशय गंभीर असून महामार्गावर अनेक ठिकाणी महामार्गालगत संरक्षक लोखंडी जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत काही ठिकाणी त्याच्या सळ्या बाहेर आल्या असून त्या वाकलेल्या आहेत त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असुन यावर वेळीच उपाय योजना सार्वजनिक बाधकाम विभाग का करत नाही असा प्रश्न अधोरेखित आहे.
अनेकदा होणाऱ्या लहान मोठ्या अपघाताची कारणे शोधण्यात सार्वजनिक बांधकाम विभागास आजपर्यंत अपयश आले असून अनेक समस्यांच्या विळख्यात हा महामार्ग सापडला असून अनेक ठिकाणी दुभाजकाच्या कडेला असलेले मातीवरुन तसेच जागोजागी साठलेल्या वाळूवरुन बाईस्वार घसरुन पडत आहेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रस्ते दुभाजकाची उंची खुपच कमी असून त्याच्या कडेला साचलेली माती त्यामुळे हे दुभाजक आताच्या उंचीनुसार रस्त्यावर असणाऱ्या गतिरोधका प्रमाणे झाले असून अलीकडून वेगाने जाणारे वाहन सहज रीत्या दुभाजकावरुन पलीकडे जात असून मोठमोठे अपघात होत आहेत तसेच दुभाजकावर असलेले लाईट बेरिअरची तर अवस्था अतिशय बिकट आहे अनेक ठिकाणी हे अर्ध तुटलेल्या अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी हे अस्तित्वातच नाही त्यामुळे राञीच्यावेळी वाहनचालकाला याचा वाहन चालवताना नाहक ञास होतो महामार्गावर गवत बाबळीचे लहान झाडे उगवली त्यामुळे अपघातात मोठी वाढ झाली आहे या महामार्गावरील रस्त्यांची अवस्था पाहून वाहनचालक व प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत असल्याने आता तरी महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष देणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.