मानसिंग नाईक विद्यालय येथे मुख्याध्यापक का विरुद्ध कोषाध्यक्ष यांचे उपोषण
पैठण;
पैठण तालुक्यातील पारुंडी येथे तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,मानसिंग नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारुंडी ता, पैठण येथे आपल्या पदाचा जाणून बुजून गैरवापर करत असलेल्या मुख्याध्यापका विरुद्ध शालेय समितीच्या कोश्याअध्यक्ष हरी मानसिंग राठोड यांनी पारुंडी येथील शाळेच्या समोर रस्त्यावर एक दिवसीय लक्षणिक उपोषण केले.
सविस्तर माहिती अशी की शालेय कोष्याअध्यक्ष यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत वेळोवेळी विनोद राठोड यांनी मानसिंग नाईक विद्यालय येथे शिक्षक म्हणून काम पाहिले त्यांचा कार्यकाळ 2012 ते 2017 या कार्यकाळातील माहिती मागवली होती. ती शालेय मुख्याध्यापक गोविंद दानशूर (खदगावकर) प्रत्येक वेळी यांनी चुकीची माहिती पुरवली या मध्ये खूप तफावत असल्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर व मनमानी करत असलेल्या संबंधित प्रशासकीय अधिकारी मुख्यध्यापक यांच्यावर कारवाई करून कायम स्वरूपी बडतर्फ करावे अशी मागणी शालेय शिक्षण संस्थचे कोषाअध्यक्ष हरी मानसिंग राठोड यांनी केली.
जवळ पास खेड्यातील अधिकारी व पदाधिकारी यांनी भेट देऊन प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यावेळी पाचोड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस जमादार रावसाहेब आव्हाड यांनी अचूक बंदोबस्त ठेवला रुपाली थोरात (तलाठी ), अर्जुन जाधव (कोतवाल )बाजीराव राठोड पारुंडी तांडा (माजी सरपंच ) गफ्फूर भाई शेख (मा.उपसरपंच ब्राम्हणगाव) चुणीलाल राठोड, अभिषेक राठोड,अलीम पठाण (एमआयएम तालुका अध्यक्ष), गोविंद दौंड, यांनी भेट दिली. संबंधित उपोषण पोलिसांनी मध्यस्ती करून मुख्याध्यापक यांना समजावून सांगितले व खादगावकार शालेय संस्था प्रशासकीय अधिकारी यांनी लेखीपत्र दिल्या नंतर पोलिसांच्या मध्यस्तीने उपोषण सोडले.