बीड (प्रतिनिधी) शाळेतून घरी आलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर गावातीलच एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी रात्री दोन वाजता दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे ठाणेप्रमुख एपीआय प्रभा कुंडगे यांनी सांगितले.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत राहणार्‍या एका ११ वर्षीय मुलीवर तिच्याच तांड्यावरील एका जणाने बलात्कार केल्याची घटना काल दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता घडली. मुलीची आई शेतात कामाला गेली होती. मुलगी दुपारी शाळेतून आल्यानंतर आजोबा सोबत जेवण केले.त्यानंतर तिचे आजोबा शेतात गेले त्यावेळी मुलगी घरात एकटी असताना त्याठिकाणी तुकाराम मेघा राठोड आला, व मुलीला बळजबरीने धरून दिल्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर कामावरून आलेल्या आईने मुलीला घेऊन दिंद्रुड पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी रात्री दोन वाजता आरोपी तुकाराम मेघा राठोड याच्या विरोधात कलम ३७६, ३७६ (२) (एबी) ३७६(२) (१) भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरराचा पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रभू कुंडगे यांनी दिली.