रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या नागोठणे येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना लवकरच न्याय मिळणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या हिराकोट तलाव येथे झालेल्या जाहीर सभेत सांगितले.
भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यानी आयोजित केली होती.
नागोठणे येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याच्या उद्देशाने ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
यावेळी भीमराव आंबेडकर आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या समवेत रिलायन्स कंपनीचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली.या सभेसाठी पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार हे दूरदृश्य प्रणाली द्वारे सभेसाठी उपस्थित होते.
यावेळी कंपनी कडे असलेली वंचीत प्रकल्पग्रस्त यांची यादी आहे तशीच यादी ही पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे आहे.उपविभागीय अधिकारी इनामदार यांनी वंचित प्रकल्पग्रस्ताची नावे वाचून दाखविली आहे.जिल्हा धिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी आणि कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी हे दोघेही एकत्रीत जाऊन जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यापैकी किती वंचित आहे रोजगारापासून याचे परीक्षण केले जाईल आणि त्यांनतर परत एक जिल्हाधिकारी आणि मुंबई येथे कामगार आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन त्यांनतर योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि जो निर्णय लागेल तो प्रकल्पग्रस्त यांच्या बाजूने लागेल अशी आशाही व्यक्त केली.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन प्रणित भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे पंचक्रोशीतील प्रकल्पग्रस्त न्यायहक्कांसाठी लढत आहेत.
प्रकाश आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त व भूमीपूत्र हे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी नेमकी काय भूमिका घेणार, पुढील आंदोलनाची रणनीति काय असेल हे स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.कारण यापूर्वी झालेल्या जिल्हाधिकारी यांच्या दालनात मागील झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर पुढे काय कार्यवाही झाली, त्याावेळी झालेल्याचर्चेत प्रकल्पग्रस्तांच्या पदरात काय पडणार आहे या प्रश्नांची उकल झाली नव्हती.
या आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनचे चिटणीस सुरेश मोहिते, रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदींसह रायगडसह राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते व पदाधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या समवेत सहभागी झाले होते.
स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते गंगाराम मिनमिने यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या लढ्याला शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, प्रकल्पग्रस्ताच्या शिष्टमंडळाने नुकतीच बाळासाहेब आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांची भेट घेतली. स्थानिक भूमीपूत्र प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली, त्या अनुषंगान आंबेडकरांनी बाजू समजून घेत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढाऊपणाची भूमिका घेण्याचे स्पष्ट केले आहे.
आपला लढा रिलायन्ससोबत आहे, यासाठी जनशक्तीचे पाठबळ उभे करू, या आंदोलनात स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांसमवेत मोठी ताकत उभी करूया. विजय आपलाच आहे.
सुरेश मोहिते
चिटणीस, प्रकल्पग्रस्त संघटना