सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2022-23 या वर्षी मिळकतीकरा साठी महापालिकेमध्ये आत्तापर्यंत 62 कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट 2021 अखेर 47 कोटी मालमत्ता कर वसुली करण्यात आली होती. यावर्षी शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर भरण्याकरिता चांगला प्रतिसाद दिला आहे.
मिळकत कर भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट पर्यंत सर्व नागरिकांनी आपले मिळकत कर ऑनलाईन भरल्यास 6 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर महापालिका येथे भरल्यास 5 टक्के सूट देण्यात येणार आहे. अशी माहिती उपआयुक्त विद्या पोळ यांनी दिली. ही योजना 31 ऑगस्टपर्यंत लागू असेल तसेच शहरातील सर्व मिळकतकराना बिले वाटप करण्यात आले.असून तसेच ओपन स्पेसचे सुद्धा बिले देण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे की ज्यांना टॅक्स पावती मिळाले नाही त्यांनी महापालिकेच्या वेबसाइटवर जाऊन बिल घ्यावे येत्या 31 ऑगस्टपर्यंत सूट देण्यात आली आहे.
1 सप्टेंबर पासून 2% टक्के दंड आणि व्याज सुरू होणार आहे.ज्या नागरिकांनी रेन हार्वेस्टिंग करून बोर मध्ये पाणी सोडले आहे. अशांना 2 टक्के तर ज्यांनी रेन हार्वेस्टिंगचे पाणी संक मध्ये सोडले आहे. त्यांना 3 टक्के सूट देण्यात आले आहे. तसेच सोलार सिस्टीम ज्यांनी बसवले आहे. त्यांना पाच टक्के सूट जाहीर करण्यात आले.तरी नागरिकांनी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त विद्या पोळ यांनी केले. 1 सप्टेंबर पासून कर विभागातील थकबाकी दारावर जप्तीची कारवाई सुरू होणार आहे. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या उपयुक्त विद्या पोळ यांनी केले.