पंधराव्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल मंजूर करून पंचायत समितीकडे पाठवण्यासाठी अडीच हजाराची लाच घेताना ग्रामसेवक आणि पंचायत विस्तार अधिकारी यांना अँटी करप्शनने रंगेहात पकडले.
सुरेश सुधाकर फारो, वय ४५ व्यवसाय नोकरी पद ग्रामसेवक, ग्रामपंचायत पारे सांगोला व श्रवण बाजीराव घाडगे ५६ वर्षे व्यवसाय नोकरी पद विस्तार अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सांगोला जि. सोलापूर यांना लाज घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
यातील तक्रारदार हे मौजे पारे ग्रामपंचायतीचे सदस्य असुन पारे गावातील गोरडवस्ती येथे पाईपलाईनचे काम १५ व्या वित्त आयोग सन २०२०-२०२१ अंतर्गत मंजुर झाले असुन सदरचे काम हे पारे ग्रामपंचायतीस मिळाले होते. त्याअनुषंगाने सदर कामाची सर्व जबाबदारी पार पाडण्याकरीता पारे येथील सरपंच यांनी लेखी आदेशान्वये यातील तक्रारदार यांची नियुक्ती केली आहे.
त्यानुसार घर नमुद काम पुर्ण झाल्यानंतर सदर कामाचे बिल मंजुर होवुन मिळणेकरीता तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता यातील ग्रामसेवक फासे यांनी सदर बिलावर सही करून पंचायत समिती सांगोला येथील विस्तार अधिकारी घाडगे यांचेकडे सादर करण्याकरीता स्वतः करीता १ टक्का १५०० रुपये पंचायत समिती येथुन बिल मंजुर होण्याकरीता विस्तार अधिकारी घाडगे करीप्रमाणे १५०० रु असे एकुण ३००० रुपयेची मागणी केली व सदर मागणीस विस्तार अधिकारी घाडगे यांनी संमती न तडजोडीअंती त्यांचे करीता ५०० रु कमी देण्यास सांगूण उर्वरीत रक्कम ग्रामसेवक यांचेकडे देण्यास सांगितली.
अनुषंगाने ग्रामसेवक फार्स यांनी तक्रारदार यांचेकडुन २५०० रु लाच रक्कम स्विकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी ०२ घाडगे विस्तार अधिकारी यांना पंचायत समिती कार्यालय यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. तरी वरील आरोपविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अमलदार पोना स्वामी, पोना घाडगे, पोशि सन्नके, चापोना उडानशीव अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.