कडवंची, तांदुळसा रानभाज्या घेणे साठी कर्मचारी यांची झुंबड…..!
सोलापूर - जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी व सहकारी अधिकारी व कर्मचारी रानभाज्यांचा आस्वाद घेऊन बचतगटांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील पार्कींग मध्ये रानभाज्या घेणे साठी झुंबड उडाली होती.
जिल्हा परिषदेत आज पासून दोन दिवस रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. घेऊन खावे असे आवाहन स्वामी यांनी केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, शिक्षणाधिकारी किरण लोहार, कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता पाटबंधारे पंडित भोसले, कार्यकारी अभियंता बांधकाम सुनील कटकधोंड, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सुर्वे आदींसह कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सिईओ स्वामी यांनी घेतला रानभाजीचा स्वाद ..!
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांनी भाजी खरेदी करून बचत गटांनी फोडणी देऊन बनविलेल्या रानभाज्या.. कडक ज्वारीची भाकरी बरोबर खाऊन रानभाज्यांचा आस्वाद घेतला.
रानभाज्या घेणे बरोबर खाणे साठी कर्मचारी अधिकारी व बाहेरून आलेले अभ्यागत देखील भोजनाचा आस्वाद घेत होते. चुलींवरील गरम भाकरी व सुक्या रानभाज्या ची मेजवाणी आज कर्मचारी यांना मिळाली. ग्रामीण तडका दिलेल्या रानभाज्यांची चव अनोखी होती.
रानभाज्या घेणेसाठी उडाली झुंबड …!
या रानभाज्या मध्ये कडवंची, चिगळ, शेपू, आंबाडा, पालक, राजगिरा, विविध भाज्या आज चंदन बटवा , राजगिरा, कडवंची, तांदुळसा, हादगा, पाथर, माठ, सरांठा, चिगळ/ घोळ, रान करडा, नाई पाला, कोळसा भाजी या गावरान भाज्या घेणे साठी जिल्हा परिषद कर्मचारी यांची झुंबड उडाली होती.
सेंद्रिय रानभाज्या खा- सिईओ दिलीप स्वामी
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ राहण्यासाठी पौष्टिक आहाराचे फार महत्त्व आहे. खते व किटकनाशकांच्या वापरामुळे फळे, धान्य व भाजीपाला विषयुक्त होत असून त्या सेवन केल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात निसर्गतः उगवून येणाऱ्या रानभाज्या अमृतापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे रानभाज्यांची ओळख करून घ्या व निकोप आरोग्यासाठी त्यांचे मुबलक प्रमाणात सेवन करा. असे प्रतिपादन सीईओ स्वामी यांनी केले.
रानभाज्यांचे आरोग्यदायी लाभ -अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे
रानभाज्यांची ओळख ग्रामीण भागातील लोकांना असते परंतु शहरी भागात या रानभाज्या सहसा कोणाला माहिती नसतात. शहरातील नागरिकांना या रानभाज्यांची ओळख व्हावी त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यदायी लाभ समजावेत म्हणून उमेद अभियानाच्या माध्यमातून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिली.
या महोत्सवात दुपारी बारा ते तीन यावेळेत रानभाज्यांची पाककृती उपलब्ध असणार आहे. सर्वांनी येथील खाद्यपदार्थ विकत घ्यावेत असे आवाहन केले आहे.