परभणी : पालम तालुक्यातील दिग्रस बंधारा पाणलोट क्षेत्रातील शेतकयांची मोठ्या प्रमाणात शेत गेले बंधा-यात मावेजा अजून अंधारात त्या मूळे शेतकरी मावेजा मिळावा याची प्रतिक्षा करीत आहे. डिग्रस बंधा-यात शेतकयांची शेती जादा प्रमाणात गेली आणि मावेजा अधिकारी मावेजा अजून ही वाढीव आदा करीत नसल्याने पालम तालुक्यातील फरकंडा येथील दिग्रस उच्च पातळी बंधा- यात अनेक शेतक-यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेले आहेत.परंतु उर्वरित राहिलेल्या फरकंडा येथील काही शेतक-यांना त्यांच्या संपूर्ण जमिनीचा अद्याप ही मावेजा मिळाला नाही दोन ते तीन वषापासून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत पाणलोट क्षेत्रातील शेतकरी करत असून मार्गदर्शन वर मार्गदर्शन मागवण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रश्न कधी निकाली लागेल या कडे शेतकयांच्या नजरा लागल्या आहे. त्या मूळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून लोक कल्याणकारी प्रशासनाला खेटे मारून शेतकरी हैराण झाले आहेत. तर बुडीत क्षेत्रात जमीन लावून ही मोबदला साठी वारंवार खेटे मारावे लागतात याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ? राज्य शासनाने जमीनभूसंपादन करून तात्काळ मोबदला वाटप करावा अशी मागणीचे अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. पण प्रशासन गंभीर पणाने दर वेळ घेत नसल्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष पसरत आहे. त्या मूळे नैराश्यमय भावना निर्माण झाला आहे. आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकयांनी अनेक वेळा उपोषणे करून शासन दरबारी मागणी करण्यात येत आहेत.
परंतु दिनांक 27/12/21 मा, मुख्य अभियंता (जस) जलसंपदा विभाग औरंगाबाद यांना कळवले अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालया ने धोरणात्मक निर्णय संदर्भात मार्ग दर्शन वरिष्ठ कार्यालयाकडे मागितलेले आहे. पण ते अद्यापही अप्राप्त आहे प्राप्त होताच पुढील कारवाई करू पण कधी प्राप्त होईल आणि कधी कारवाई होईल याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला वाटप करण्यात यावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी तात्काळ दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असे शेतकऱ्यातून बोलले जात आहे