'ज्ञानेश्वर कटके सोशल फौंडेशन'चा उपक्रम; सहभाग घेण्याचे आवाहन

वाघोली : प्रतिनिधी

             ज्ञानेश्वर कटके सोशल फौंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची मोफत कार्यशाळा रविवारी (दि.२८) वाघोली येथे आयोजित करण्यात आली असून कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शकांकडून मूर्ती बनविण्याचे व रंगविण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

          यंदाच्या गणेशोत्सवाकरिता मुलांना, नागरिकांना स्वतःची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविता यावी या उद्देशाने 'ज्ञानेश्वर कटके सोशल फौंडेशन'च्या वतीने वाघोलीत मोफत शाडू माती गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत मूर्ती बनविण्याकरिता लागणारी शाडू माती आयोजकांकडून पुरविली जाणार आहे तर तज्ञ मार्गदर्शकांकडून मूर्ती बनविण्याचे व रंगविण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. १० वर्षाखालील मुलांसोबत पालकांनी सोबत येणे आवश्यक असून ज्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी व अधिक माहितीसाठी ज्ञानेश्वर कटके यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

ज्ञानेश्वर (आबा) कटके जनसंपर्क कार्यालय, वाघोली 

८९५६०१०३५६/७७७६०२११०९