यवतमाळ : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक संघाच्या वतीने  माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांना देण्यात आले. समस्या तत्काळ निकाली काढण्यात येईल, असे आश्‍वासन शिक्षणाधिकार्‍यांनी दिले. यावेळी अरविंद देशमुख, अशपाक खान, रामकृष्ण जिवतोडे, विजय खरोडे, मनोज जिरापुरे, पवन बन, आनंद मेश्राम, गंगाधर गेडाम, मंगला वाडकर, पंकज राठोड, किशोर बोडखे, दत्तू महाकुलकर, शाम बोडे, लक्ष्मीकांत खासे, विनोद मंगम,शैलेश नांदेकर, जयंत मेश्राम, अरविंद खोके, प्रकाश कुठेमाटे आदींसह शिक्षक उपस्थित होते.