पाचोडमध्ये "प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली "

  

पाचोड/

येथील ता.पैठण शिवछत्रपती महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे महाविद्यालरितून बाजारपेठ ते बस बसस्थानकांपर्यंत प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली काढण्यात आली.

यावेळी प्राचार्य चंद्रसेन कोठावळे रॅलीचे उद्घाटन करून त्यांनी काही लोकांना प्राथमिक स्वरूपात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच सर्व उपस्थित त्यांना आवाहन केले की, प्लास्टिक वापराचे खूप मोठे दुष्परिणाम आपण व आपल्या येणाऱ्या पिढीला भोगत आहोत व भोगावे लागणार आहेत म्हणून आपण या प्रसंगी सर्वांनी संकल्प केला पाहिजे की आपण सर्व मिळून शपथ घेऊया आज पासून "प्लास्टिक बंदी करूया सर्व दुकानदारांकडून कापडी पिशवीचा आग्रह धरू या" असे आव्हान त्यांनी केले .

      तसेच याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख यांनी रॅलीचे संपूर्ण नियोजन करून रॅली दरम्यान कापडी पिशव्यांचे वाटप केले व कापडी पिशवी देताना त्याचे फायदे सांगून प्लास्टिकचे दुष्काम काय होतात त्याचे सविस्तर माहिती दिली व आजपासून प्लास्टिकच्या बंदी करूया व संकल्प करूया हे आवर्जून कापडी पिशवी देतांना सांगितले .

      तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक भुमरे दादा यांनी रॅलीच्या समारोपप्रसंगी सर्व उपस्थित त्यांना आवाहन केले की प्लास्टिक पिशव्या वापरू नये त्याचे दुष्परीणाम गुरे खातात व ते मरण पावतात .नद्या ,नाले ,गटारी तुडुंब भरतात पाणी दूषित होते त्याचे दुष्परिणाम होतात त्याचा परिणाम आपल्या स्वास्थावर होतो प्लास्टिक हे निसर्गाला हानी पोहोचवते म्हणून आपण त्याचा वापर टाळावा असे आव्हान त्यांनी केले . 

      या प्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. नलावडे ,डॉ.चव्हाण ,डॉ. यादव डॉ. बानायत, डॉ.बिडवे, डॉ.जाधव ,डॉ. पोटभरे ,प्राध्यापक संदीप ,प्राध्यापक जैन, प्राध्यापक कांबळे, प्राध्यापक चित्ते ,प्राध्यापक कदम, प्राध्यापक गावंडे,वैभव राऊत आदी जण उपस्थित होते..