अमरावती शहर गुन्हे शाखेने अमरावती शहरातील महेंद्र कॉलनी परिसरातील पान सेंटरसमोरून एका तरुणाकडून ३० हजार रुपये किमतीचा देशी कट्टा जप्त केला आहे . गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. शेख मोहसिन शेख सलीम ,राहिहबीब नगर नंबर १, अमरावती याला अटक करण्यात आली आहे.मोहसीन हा एक गावठी बनावटीची पिस्टल घेऊन असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

त्याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखाप्रमुख अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतीश देशमुख, निवृत्ती काकड, अजय मिश्रा यांनी ही कारवाई केली आहे