अंबड-घनसांवगी तालुक्यात मराठवाडा शिक्षक संघाची बैठक संपन्न

औरंगाबाद; जानला जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील मराठवाडा शिक्षक संघाची बैठक आज (दि.६) वार शनिवार रोजी संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मारोती तेगंमपुरे तसेच जिल्हाअध्यक्ष रमेश आंधळे तसेच केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रेमदास राठोड व आरेफ कुरेशी व जिल्हा सचिव संजय येळवंते व जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे व जगन वाघमोडे यांची उपस्थिती होती. यावेळी अंबड व घनसावांगी तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अंबड तालुका अध्यक्ष म्हणून रमेश गाढे, सचिव म्हणून गणेश मेहत्रे यांची तर उपाध्यक्ष म्हणून मनोहर पटेकर यांची तर सहसचिव म्हणून सचिन अंबडकर , कोषाध्यक्ष म्हणून भरत डावकर व कार्याध्यक्ष म्हणून विष्णू इप्पर तर मार्गदर्शक म्हणून पोपटराव यादव व आनंत जायभाये तर घनसावांगी तालुका अध्यक्ष म्हणून शिवहारी किसनराव कायंदे , सचिवपदी राधेश्याम चौधरी व उपाध्यक्ष म्हणूनडी .जे .आवारे तसेच सहसचिव म्हणून ज्ञानेश्वर बाबाराव पवार व कोषाध्यक्ष म्हणून शहादेव सिताराम नाडे व कार्याध्यक्ष म्हणून नारायण झरेकर यांची तर मार्गदर्शक म्हणून विलास धडके तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून विष्णू आश्रोबा भाबट व डी. पी. राऊत यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबड व घनसावांगी तालुक्यातील सर्व मराठवाडा शिक्षक संघाच्या शिक्षकांनी मेहनत घेतली व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय येळवंते तर सूत्रसंचालन हकीम पटेल तर आभार प्रदर्शन भगवान धनगे यांनी केले.यावेळी अंबड व घनसावंगी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते.