सोलापूर :-जिल्हा सत्र न्यायाधिश श्री. व्ही. एच. पाटवदकर यांनी दिनांक मौजे चिंचपूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील महिबुब जिलानी पटेल, वय २५ वर्षे याची सदोष मनुष्यवध आरोपातून सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

यात हकीकत अशी की, दि.०२/०६/२०१८ रोजी नांदणी ते बरुर रोडवर फिर्यादीचे चुलत भाऊ रायप्पा सिध्दप्पा सलगरे रा.नांदणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर हा मोटारसायकल नंबर एम.एच.- १३/बी.ई.-६१८४ वरुन शेतामध्ये काम करणेसाठी मजूर आणणेकरीता नांदणी गावाकडे जात असताना पाठीमागून टिप्पर नंबर एम.एच.- ११ / ए. एल. २१६७ हा वेगात येऊन जोरात धडक दिल्याने जागेवरच शरीराची चेंदामेंदा होऊन मयत झाला होता व मोटरसायकलचे नुकसान करुन मयतास कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध न करता जाणीवपूर्वक जाणूनबुजून गंभीर जखमी करुन घटनास्थळी मरणासन्न अवस्थेत सोडून गेल्यानेच मयत झाल्याचे खबर फिर्यादी सुभाष लगमण्णा सलगरे यांचे सांगण्यावरुन भा.द.वि. कलम ३०४(२). २७९, ४२७ व मोटर वाहन कायदा कलम १८३, १८४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता.

सदर गुन्ह्याचा तपास मंद्रुप पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी तपासअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

सदर केसच्या सुनावणीवेळेस सरकारपक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. सदर केसच्या अंतिम युक्तीवादावेळी यातील आरोपीचे वकील अॅड. नागेश खिचडे यांनी सरकारी साक्षीदारांचे साक्षमधील विसंगती पाहता साक्षीदार हे नेत्र साक्षीदार म्हणून विश्वासाह नसल्याचे याद मांडला.

सदर युक्तीवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा सत्र न्यायाधिश यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपी तर्फे अॅड. नागेश खिचङे तर यात सरकार पक्षातर्फे अँड दत्ता पवार यांनी काम पाहीले.