वैजापूर
पोलीस मित्र संघटना शाखा वैजापूर चे उदघाटन सहायक पोलिस निरीक्षक रामप्रसाद घाडगे,व या संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख जी,एम,भगत व जिल्हा शाखा अध्यक्ष अशोक पा,वरकड यांच्या हस्ते मंगळवार(ता,२३)रोजी संपन्न झाले,सदरील शाखा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली ची शाखा आहे, या शाखे मार्फत सामाजिक बांधीलकी व समाजाचे काही देणे लागतो हा भाव ठेऊन समाजातील गोर गरीब दीन दुबळे याना साहाय्य करने,पोलिसांना विधायक व रचनात्मक कामात मदत करणे आहे,असे आपल्या प्रास्ताविकात या संघटनेचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांनी सांगितले,स,पो,नि राम घाडगे यांनी या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर जी ,एम,भगत यांनी या प्रसंगी या शाखेच्या पदाधिकारी वर्गाला विधायक व रचनात्मक काम करतांना सामाजिक मूल्ये जपण्याचे आवाहन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले,आरंभी रेबिन सोडुन शाखेचे उदघाटन पडदा बाजूला सारून नामफलक उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले,तालुका शाखा अध्यक्ष मजनू पठाण,शहर अध्यक्ष जयवंत उर्फ बंडू पांचाळ ,सदस्य काकासाहेब गव्हाणे,विलास कुहिले,नामदेव मतसागर,समीर शेख, धनंजय पांचाळ,बाळासाहेब सरोदे, देवचंद कुहीले,सुनीता होंडे,सुनीता कुहिले यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले,सूत्र संचलन डी,डी, ठाकूर यांनी केले तर आभार बंडू पांचाळ यांनी केले,या प्रसंगी शाखेचे प्रदेश उपाध्यक्ष बाजीतसिंघ लांबा,योगेश निकम,अशोक कराळे ,शिवाजी त्रिभुवन,सोमनाथ भांवर,अरुणा पवार, आशाताई खरसाने, परमेश्वर आव्हड,सोमनाथ जगताप,अजय शेलार यांची उपस्थिती होती.