रांजनगाव दांडगा शिवारातील विहीरीत तरुणाचे सापडल्याने उडाली खळबळ

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

.........................................................

   (  पाचोड,) एकवीस वर्षीय युवकाचा हात- पाय बांधलेल्या अवस्थेत विहीरीत मृतदेह सापडून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असुन घातपात की आत्महत्या या बाबत संभ्रम निर्माण झाला. ही घटना रांजनगाव दiडगा (ता.पैठण) शिवारात मंगळवारी (ता.२३) दुपारी घडली असून आकाश वसंत मगरे रा. रांजनगाव दiडगा (ता.पैठण) असे मृतकाचे नाव आहे.

       अधिक माहीती अशी, रांजनगाव दांडगा येथील मगरे कुटुंबिय शेतवस्तीवर वास्तव्या स असुन रविवारी (ता.२१) दुपारी वसंत मगरे यांचा एकवीस वर्षीय मुलगा आकाश मगरे हा घरातुन बेपत्ता झाला. सायंकाळी आकाश घरी न आल्याने त्याच्या कुंटुबियांनी सोमवारी (ता.२२) सर्वत्र मित्र, आप्तेष्टांकडे त्याची माहिती घेतली ,परंतु काही एक त्याची माहीती मिळाली नाही. मंगळवारी (ता.२३) घरालगत असलेल्या विहीरीतुन दुर्गंधी येत असल्याने कुटुंबियांनी विहीरीत डोकावून पाहीले असता पालथ्या अवस्थेत आकाशचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. मृतदेह पाहताच नातेवाईकानी हंबरडा फोडला

. रडण्याचा आवाज ऐकुन आजुबाजुच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, या घटनेची पाचोड पोलिसांनी माहीती मिळताच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॅा. विशाल नेहुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला असता आकाशयाचे दोन्ही हात, दोन्ही पाय दोराने बांधलेले तर कमरेलाही दोरीचा फासा दिलेला, दात पडलेले दिसल्याने या विषयी खून की आत्महत्या या विषयी संभ्रम निर्माण होऊन सर्वजण चक्रावून गेले. सायंकाळी उत्तरणीय तपासणीसाठी मृतदेह पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तुर्तास पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणुन घटनेची नोंद केली असून पोलिसांनी बारकाईने घटनास्थळाचे निरीक्षण केले, मात्र काही संशयास्पद वस्तु सापडून आल्या नाहीत. परंतु हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने तपासाचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

सोबत फोटो:

राजनगाव दांडगा(ता.पैठण): घटनास्थळाची पोलिसांनी बारकाईने पाहणी केली.

मयत: आकाश मगरे