स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या ८५ वी जयंती व आजादी का अमृत महोत्सव औचित्य साधून विष्णूपंत कोठे प्रतिष्ठान व राजेश अण्णा कोठे गणेशोत्सव मंडळ वतिने शालेय विद्यार्थ्यांना ५००० वह्यांचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

अभिमान श्रीनगर येथील लोकमंगल माध्यमिक प्रशाला या ठिकाणी ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज,ज्येष्ठ सामाजिक नेते प्रतापसिंह चौहान काका,सामाजिक कार्यकर्ते उज्वल दीक्षत यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम मंगळवार दि २३.०८.२२ रोजी संपन्न झाला.मनोगतामध्ये इंगळे महाराजांनी विद्यार्थ्यांना उद्याच्या भारताचं उज्वल भविष्य घडण्यासाठी योग्य शिक्षण घेऊन देश सेवेसाठी सज्ज होण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच कोठे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक कार्याचा उल्लेख त्यांनी मनोगता मध्ये व्यक्त करून प्रतिष्ठानच्या कौतुक केले.प्रास्ताविक उत्सवा अध्यक्ष यश अण्णा शिंदे यांनी केले.

सुशील रसिक सभा येथे स्वर्गीय ढमाळ गुरुजी यांच्या विमल कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांना वही वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमास ज्येष्ठ संपादक अविनाश कुलकर्णी साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन भविष्यात मोठ्या पदावरती गेल्यानंतर समाजाची जबाबदारी स्वीकारून गरजूवंत लोकांसाठी मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केले तसेच देवेंद्र कोठे यांच्या वतीने प्रतिष्ठान द्वारे करण्यात येणारे विविध कार्यक्रम आत्मतृप्ती योजना, कोरोना काळात केलेलं कार्य याविषयी कार्याचा उल्लेख करून प्रतिष्ठानचे कौतुक केले.

देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतामध्ये ज्या विद्यार्थ्यांना वडील अथवा माता-पिता पालक नाहीत अशा गरजवंत विद्यार्थ्यानी शाळेच्या मार्फत प्रतिष्ठांना संपर्क साधण्याचे आवाहन केले निश्चितच मदतीच्या माध्यमातून खारीचा वाटा प्रतिष्ठांच्या वतीने उचलला जाईल अशी गवाही यावेळी दिली.

कार्यक्रमास मंडळाचे सल्लागार सुरज भैय्या चौहान,उत्सव अध्यक्ष यश अण्णा शिंदे,पवन खांडेकर,सुरज जाधव, सिद्धेश्वर कमटम, नामदेव काका शिंदे विनायक मोरे,अजय चौहान ,रवी ससाने, धीरज नवगिरे,रमेश भिसे,क्रांती गोयल प्रतीक अग्रवाल,जैद बेलीफ आधी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गोयल, सचिन काशीद,प्रभागाकर जक्का, विजय भडकवाड, रोहित कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकमंगल प्रशाला व विमल कन्या प्रशालेच्या शिक्षक शिक्षके कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने कार्यक्रमाची समाप्ती झाली.