परळी वैजनाथ (प्रतिनीधी) राष्ट्रप्रेमाचे प्रतिक असलेला तिरंगा दि.13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस नागरीकांना आपापल्या घरी व खाजगी मालमत्तेवर फडकावण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली होती.स्वातंत्र्यदिन होवुन सात दिवस उलटले तरी अनेकांच्या घरावर,वाहनावर, दुकानावर तिरंगा ध्वज असुन हा एकप्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान असुन नागरीकांनी राष्ट्रध्वज उतरवुन घ्यावेत.यासाठी प्रशासनाने मोहीम राबवून राष्ट्रध्वज न उतरवणार्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केली आहे.याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त सर्व सामान्य नागरीकांना आपल्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणी तिरंगा फडकावण्याची परवानगी दिली होती.यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या त्यात राष्ट्रध्वज स्वातंत्र्यदिनी सायंकाळी उतरवावेत असे आवाहन करण्यात आले होते.स्वातंत्र्यदिन होवुन सात दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी तिरंगा फडकताना दिसत आहे.वारा,पाऊस यामुळे ध्वज फाटुन अवमान होत आहे.ज्या नागरीकांनी राष्ट्रध्वज उतरवले नाहीत अशा नागरीकांनी सन्मनाने तिरंगा उतरवुन घ्यावा असे आवाहन करत जे नागरीक तिरंगा उतरण्यास दुर्लक्ष करत आहेत त्यासाठी तहसिल,पोलिस व नगरपालिका प्रशासनाने मोहीम हाती घेवुन राष्ट्रध्वज उतरवुन घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
एका शिपाई महिलेवर तीक्ष्ण हत्यारांनी वार; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
एका शिपाई महिलेवर तीक्ष्ण हत्यारांनी वार; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
গোলাঘাট কৃষি বিভাগৰ কাৰ্য্যালয়ত দুৰ্নীতিৰ অভিযোগ ভিত্তিক তদন্ত কৰিবলৈ অহা দলটোৱে জিলা
গোলাঘাট কৃষি বিভাগৰ কাৰ্য্যালয়ত দুৰ্নীতিৰ অভিযোগ ভিত্তিক তদন্ত কৰিবলৈ অহা দলটোৱে জিলা
ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕು ಎಂದು ಜಯಮ್ಮ ಅವರು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು.
ಬೆಂಗಳೂರು ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ ನಲ್ಲಿ ' ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯರ ಮತ್ತು ಸಹಾಯಕಿಯರ ಸಂಘಟನೆಗಳ ಸಂಯುಕ್ತ...
Abdullahs, Mufits, Gandhis should be banished from J&K in coming elections : Chugh ll J&K needs peace and prosperity not guns and grenades: Chugh
BJP national general secretary Tarun Chugh , who is also the party incharge for J&K, today...
Vitamin D Rich Food: इन फूड आइटम्स में मिलेगा धूप से ज्यादा Vitamin D, हड्डियां हो जाएंगी स्ट्रॉन्ग
Vitamin D शरीर में हड्डियों सूजन नींद हार्ट मेंटल हेल्थ और कई अलग-अलग बॉडी पार्ट्स में एक अहम रोल...