जाहिरात व बील न देणाऱ्या राजकीय नेतांच्या बातम्यावर निर्बंधःगंगाखेड पञकांराचा निर्णय

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गंगाखेड:-वर्षभर लोकप्रतिनिधी यांच्या प्रत्येक बातम्या प्रकाशित करून ही जाहिरात न देणाऱ्या व जाहिरात प्रकाशित करून ही बील न देणाऱ्या राजकीय नेतांच्या बातम्यावर निर्बंध टाकण्याचा निर्णय गंगाखेड येथील पञकारानी एकमुखी घेतला आहे.

गंगाखेड येथील शासकीय विश्रामगृहात पञकारांची बैठक घेण्यात आली या बैठकीत पञकार बालासाहेब कदम,भिमराव कांबळे,बालासाहेब जंगले,भागवत जलाले, मोसीन खान, गुणवंत कांबळे प्रा.अकूंश वाघमारे,राजेश कांबळे, अनील शेटे बाळू स्वामी, उत्तम आवंके, गोविंद चोरघडे, सुनील कोणार्डे, विनायक भोसले, एम.बी.भिसे, महेमुद शेख,अनील साळवे राहूल साबणे, अली चाऊस रोहिदास लांडगे,शाम पंडीत सुभाष शिंदे उपस्थित होते यावेळी पञकांरा सोबत राजकीय खेळी करणाऱ्या नेत्यांचा समाचार घेण्यात आला.गंगाखेड येथील राजकीय नेते प्रसिद्धी साठी पञकारा समोर सातत्याने गोंडा घाळतात मंञ्याचा कार्यक्रमात मंञ्याचा कानात साहेब पाणी आणू का असे विचारतात पण पञकांराना सांगतात मी साहेबांना विकास कामाचा निधी मागितला आणी मंजूर केला फोटो सह बातमी घ्या.तर अनेक राजकीय नेते मंञालयात जावून मुख्यमंञ्याचे अभिनंदन करतात की लगेच पञकांराना विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर फोटो सह पहिल्या पानावर बातमी घ्या असे म्हणणारे राजकीय नेते कार्यक्रमाची जाहिरात देण्याची वेळ आली की देऊत की अजून वेळ असे म्हणून वेळ साधून नेण्याचे काम राजकीय नेत्याचे सुरू आहे.कोरोना कालावधीत एक ही राजकीय नेता जनसामान्यात सक्रीय नव्हता पण गंगाखेड येथील रस्तावरच होते कोरोनात भयभीत नागरिकांचा समस्या आरोग्य विभागाकडे कळवित होते तर राजकीय नेते घरात होते.गंगाखेड येथील पञकांरानी राजकीय नेत्यांचा येणाऱ्या कार्यक्रमाची जाहिरात मिळेल याच आशेवर बातम्या प्रकाशित केल्या पण शेवटी निराशा झाली मोजक्या हुजरेगिरी करणाऱ्याना जाहिरात दिल्या.दुःख जाहिरात न मिळाल्याचे नाही राजकीय नेत्यानी गंगाखेड येथील पञकाराना गृहीत धरल्याचे आहे.अनेक राजकीय नेते जाहिरात प्रकाशित करून बील देण्याची वेळ आली की तोंड लपवून बसतात बील मागितले की देऊत सध्या अडचण आहे कामाचे बीलच भेटले नाही अशी वल्गना करतात ह्या नेहमीचा प्रकारास गंगाखेड शहरातील सर्वच पञकांनी लबाड राजकीय नेत्यांच्या बातम्यावर बॕन करून यापूढे फुकट्या राजकीय नेत्यांना प्रसिद्धी पासून दुर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.