परळी / (आप्पासाहेब गोरे)
मराठवाडा शिक्षक संघाची परळी तालुका व शहर कार्यकारणीची निवड करण्यासाठी सोमवार (दि.22) रोजी कॉ.वैजनाथराव भोसले सांस्कृतिक सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कालीदास धपाटे तर व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारणी सदस्य अशोक मस्कले, बंडू अघाव, जिल्हा सचिव गणेश आजबे, जिल्हा सहसचिव परवेज देशमुख, विजय गणगे, माजी जिल्हाउपाध्यक्ष सुरेश काजळे, सोपान निलेवाड, मावळते तालुकाध्यक्ष के.आर.कस्बे, मावळते शहराध्यक्ष राजकुमार लाहोटी, प्राचार्य अरुण पवार, मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत परळी तालुका व शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड पार पडली. बैठकीचे प्रास्ताविक बंडू अघाव यांनी केले.सुत्रसंचालन अंनत मुंडे यांनी केले तर आभार यरकलवाड यांनी मानले.
परळी तालुका कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष: श्री.अनुप कुसुमकर (महाराष्ट्र विद्यालय, मोहा),सचिव : श्री श्रीधर माधवराव गुट्टे (श्री केदारी महाराज विद्यामंदिर, नंदनज)
कार्याध्यक्ष पदी श्रीहरी वाल्मीकराव दहिफळे (सोमेश्वर विद्यालय, जिरेवाडी), उपाध्यक्ष श्री ज्ञानोबा मोतीराम गडदे (संत तुकाराम विद्यालय, नागापूर)
उपाध्यक्ष श्री बालासाहेब जाधव (संचारेश्वर विद्यालय, दादाहरी वडगाव) सहसचिव श्री अघाव बी.टी.(जिजामाता विद्यालय, धर्मापुरी) सहसचिव श्री राजाभाऊ सुर्यभान नागरगोजे (बालाघाट विद्यालय, दौनापूर) कोषाध्यक्ष: श्री एकनाथ शेषराव लांडगे(माध्यमिक आश्रमशाळा) संघटक:श्री राजाभाऊ राठोड (शारदाबाई मेनकुदळे विद्यालय, संगम)
प्रसिद्धी प्रमुख : श्री कांदे डी.एल.(रत्नेश्वर विद्यालय, टोकवाडी)
कार्यकारिणी सदस्य : गोपीनाथ सोनवणे (विवेकानंद विद्यालय, गाडे पिंपळगाव), लक्ष्मण राऊत (व्यंकटेश विद्यालय, सोनहिवरा), रामलिंग गडदे (रामचंद्र विद्यालय, बोधेगाव) आदींची निवड करण्यात आली तर परळी शहर कार्यकारिणी मध्ये
अध्यक्ष म्हणून संजय प्रभाकर गोरे (संभाजी विद्यालय), सचिव : आलिशान काजी (बिलाल उर्दू मा.विद्यालय)
कार्याध्यक्ष : यरकलवाड जी.एम.(माध्यमिक आश्रमशाळा) उपाध्यक्ष : अघाव डी.एस. (जगमित्र नागा विद्यालय) उपाध्यक्ष : निला आर.जी.(विद्यावर्धिनी विद्यालय) सहसचिव : पुंडकरे पी. टी.(सरस्वती विद्यालय) सहसचिव : खोतपाटील बापुराव (शिवछत्रपती विद्यालय)
कोषाध्यक्ष : उध्दव गोरे (कृष्णाबाई देशमुख विद्यालय) संघटक: संभाजी फुलारी (नविन माध्यमिक विद्यालय) प्रसिद्धी प्रमुख: अंनत मुंडे (भगवान विद्यालय) कार्यकारणी सदस्य: संजय फड(नागनाथ निवासी विद्यालय),खान जब्बार अजीज (इमदादुल उलुम विद्यालय) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.