यवतमाळ : यवतमाळ जिल्हा हा कृषीप्रधान आहे. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याने सातत्याने चिंता व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी उमेदच्या माध्यमातून तीन वर्षापासून सेंद्रीय शेतीचा प्रयोग राबविण्यात येत आहे.त्यासाठी शेतकर्‍यांना कृषी विज्ञान केंद्राकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. उमेदच्या माध्यमातून सेंद्रीय शेती करण्यात आल्याने महिला आत्मनिर्भर झाल्या आहे. येथील वसंतराव नाईक स्वालंबन केद्रात शेतकरी गटांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, उमेदचे व्यवस्थापक नीरज नखाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.