डीपीच चोरट्यांनी नेल्याचे शेतकऱ्यांना काढावी लागते रात्र अंधारात.
वैजापूर :- शैलेंद्र खैरमोडे
वैजापूर तालुक्यातील घायगाव शिवारातील गलांडे वस्ती येथे शेत गट क्रमांक २६२ मध्ये बसवण्यात आलेले रोहित्रातील एक क्विंटल वजनाची तांब्याची तार व १८० लिटर ऑईल चोरांनी लंपास केले. या दोन्हींची किंमत सुमारे ६९ हजार रुपये आहे. तालुक्यातील घायगाव शिवारातील गलांडे वस्ती येथे महावितरणचे रोहित्र (विद्युत डीपी) आहे. वायरमन वसंत आव्हाने यांना २१ ऑगस्ट रोजी डीपीमधील ऑईल व तांब्याची तार चोरी झाल्याचे दिसुन आले. याबाबत त्यांनी वैजापूर ग्रामीण दोनचे सहायक अभियंता अनिल डुकरे यांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी डुकरे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे